प्रिय पुणेकरांनो,

नमस्कार, मी संग्राम खोपडे. गेल्या २२ वर्षांपासून मी रेडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत रोज पोहोचतो आहे. इतकी वर्षे सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केल्यावर समाजाच्या मनामध्ये काय दडलंय आणि ते कसं मूर्त रूपात आणता येईल याचा चपखल अंदाज मला आहे, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. गेली १० वर्षे मी माझं पुणे शहर सतत बकाल होताना पाहतो आहे. मागच्या वर्षभरात तर मी झपाटल्याप्रमाणे अगदी सफाई कर्मचाऱ्यांपासून ते IT कंपन्यांच्या CEO पर्यंत ४५ हजार पुणेकरांसोबत बोललो. त्यांच्या समस्यांविषयी सखोल चर्चा केली, अभ्यास केला, नोट्स काढल्या, आणि अगदी एखाद्या विद्यार्थ्यासारखा सर्व इश्यूंचा गुंतवळा सोडवण्याचा प्रयत्न केला.

पुण्याच्या मानगुटीवर बसलेल्या १२ मुख्य प्रश्नांवर एक परिपूर्ण असे डॉक्युमेंट एक वर्ष भर राबून मी तयार केले. जो आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न होता, तेच त्या डॉक्युमेंटचे नाव झाले: ‘MH१२ चे बारा कसे वाजले?’ त्यासोबतच या सगळ्या प्रश्नांवर उपाय म्हणून The Pune Model For Governance ची मांडणीही मी त्या डॉक्युमेंटमध्ये केली.

या दरम्यान मला एका गोष्टीची प्रखरपणे जाणीव झाली. ती म्हणजे की पुणेकर हा जगभर सगळीकडे पसरलेला आहे. अमेरिकेत, युरोपात, ऑस्ट्रेलियामध्ये नव्हेच तर जपानमध्ये सुद्धा पुणेकर आहे. भारतभर पुणेकर आहे, अगदी उत्तरपूर्वेकडे सुद्धा. पुणेकर नाही तो फक्त पुण्यात. पुण्यात आहे तो कोथरूडकर, डेक्कनकर, कॅम्पवाला, कल्याणी नगरकर, हिंजेवाडीकर, व औंधकर. एकाच्या प्रश्ना बद्दल दुसऱ्याला आत्मीयता नाही. प्रत्येकाला आपापले प्रश्न आणि आपापले जीवन इथपर्यंतच चिंता. आणि म्हणून पुण्याचे जे मुख्य प्रश्न आहेत ते सुटत नाहीत कारण हे सर्व प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, किंबहुना या प्रश्नांची उत्तरं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी या सर्व प्रश्नांकडे आणि त्यांच्या उत्तरांकडे holistically बघण्याची एक नितांत गरज आहे.

आणि ते करण्यासाठी पाहिजे आपल्यात एकता. सर्व पुणेकरांनी स्वतःला पुणेकर समजून जर या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केलं तर हे प्रश्न आपल्याला सुटणं काही फार कठीण नाही. परंतु जोपर्यंत एकता नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही किंमत देणार नाही आणि आपले मुद्दे तसेच राहतील. थोडक्यात, एकता नाही म्हणून न्याय नाही आणि न्याय जर मिळवायचा असेल तर एकता ही फार महत्त्वाची. म्हणूनच: पुणे जोडो न्याय यात्रा.

मागच्या आठवड्यात तुम्ही माझ्यासोबत या यात्रेमध्ये सहभागी झालात. आपल्या समस्यांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी  हा आपल्या सगळ्यांचा मिळून एक ऐतिहासिक असा प्रयत्न होता. पुणे जोडो न्याय यात्रेमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ३० लाख लोकांपर्यंत पोहोचू शकलो. यात्रेच्या व्हिडिओजना ८ लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले. त्यात ५० हजार लाईक्स आणि ३ हजारांच्यावर कमेंट्सचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांनी स्वतःहून संपर्क करुन या उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली.

यात्रा ही भारतीय परंपरेतील एक सुंदर संकल्पना आहे. यात्रेमध्ये प्रवास हा मुक्कामा एवढाच महत्त्वाचा असतो. यात्रेमुळे जग किती बदलेल हे सांगणं कठीण आहे, परंतु यात्रेमुळे यात्री नक्कीच बदलतो. आणि हाच बदल जगामध्ये घडवून आणण्यासाठी, आपल्या भारतीय संस्कृतीत यात्रा ही महत्त्वाची. आणि पुन्हा म्हणूनच: पुणे जोडो न्याय यात्रा.

तुमच्याबरोबर जे संवाद घडले, जे संभाषण झालं, जे प्रेम भरभरून मिळालं, आणि जे शिकायला मिळालं, त्याबद्दल मी तुमचा आणि आपल्या या सुंदर शहराचा नेहमीच ऋणी राहीन. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी सगळ्यात मोलाची गोष्ट आहे.

हा आहे माझा संग्राम पुण्यासाठी, आपला संग्राम पुण्यासाठी. बोलत राहू, भेटत राहू, पुण्यासाठी काम करत राहू.

तुमचाच,
संग्राम खोपडे
पुणे लोकसभा

bottomv2
Image Caption / TItle
Image Caption / TItle

पुणे जोडो न्याय यात्रा ही पुणेकरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, अनेक वर्षांपासून नेतृत्वहीन पुणे शहराला न्याय मिळवण्यासाठी काढलेली ऐतिहासिक आणि एकमेवाद्वितीय अशी यात्रा आहे. उभ्या भारतात एखाद्या शहराच्या अस्मितेने एवढा हुंकार भरला आणि अन्यायाविरोधात यात्रा काढली याचे हे आधुनिक इतिहासातले एकमेव उदाहरण. संग्राम खोपडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जोडो न्याय यात्रा तिच्या उदात्त उद्दिष्टांना सुफळ संपूर्ण करेल असा पुणेकरांचा आशीर्वाद आहे.

२ मार्च २०२४ चे वेळापत्रक

स ६:०० श्री कसबा गणपती मंदिर
स ६:१५ राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवबा पुतळा, लाल महाल
स ६:३० लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई
स ६:४५ ते ७:३० हुतात्मा बाबू गेनू सार्वजनिक वाहन तळ, महात्मा फुले मंडई
स ८:०० ते ९:०० सावित्रीबाई फुले विश्वविद्याल मुख्य द्वार, युनिव्हर्सिटी सर्कल
स ९:३० ते १०:३० गुडलक कट्टा, फर्ग्युसन कॉलेज रोड
स १०:४५ ते ११:४५ काँग्रेस भवन
दु १२:१५ ते १:३० पंडित फार्मस, डीपी रोड, राजाराम पुल-म्हात्रे पुल जोड रस्ता
दु २:०० ते ३:०० आबासाहेब गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता
दु ३:०० ते ४:०० रिलायन्स सेंट्रो/गरवारे कॉलेजच्या मागची बाजू, एस एम जोशी मार्ग
सायं ४:३० ते ५:३० पद्मश्री ग दि माडगूळकर उद्यान, बावधन
सायं ६:०० ते ७:०० ARAI वाहन तळ, वेताळ टेकडी

Click to download the Protocol For The Pune Jodo Nyay Yatra.

३ मार्च २०२४ चे वेळापत्रक

स ७:१५ ते ८:३० रेस कोर्स जॉगिंग ट्रॅक मुख्य द्वार
स ९:०० ते ९:३० आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवर्स जवळ, पुणे कॅम्प
स १०:०० ते १०:३० लोकशाहीर आण्णाभाऊ साठे रंगमंदिर, एअरपोर्ट रोड
दु १:०० ते २:०० हॉट फूट (Hotfut) खराडी
दु ३:०० ते ४:०० ओझोन मॉल, स्टारबक्स शेजारी, औंध
सायं ५:०० ते ६:०० महात्मा फुले सांस्कृतिक भवन, फातिमानगर
सायं ७:०० ते ८:०० राजीव गांधी ई लर्निंग स्कूल, सहकारनगर
सायं ८:३० ते रा ९:३० सारसबाग चौपाटी, पेशवे उद्यानाशेजारी

FAQs

यात्रेसाठी नाव नोंदवणे (रजिस्टर करणे) आवश्यक आहे का?

यात्रेसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक नाही. तरीही आपण जर रजिस्टर केले तर आपल्याला यात्रे अगोदर reminder येईल. त्याचबरोबर RJ संग्राम खोपडेंविषयी, त्यांच्या कामाबद्दल, पुण्याच्या मुद्द्यांबद्दल, आणि यात्रे संबंधित इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला तुम्ही दिलेल्या contact information मुळे सोपे जाईल.

यात्रेच्या सुरुवातीपासून मी येऊ नाही शकलो तर? आणि मला यात्रा मध्ये सोडून जायला लागलं तर?

ही तशी यात्रा नाहीच आहे. ही यात्रा आहे कायम चालणारी यात्रा. दोन आणि तीन तारखेला आपण काही ठराविक ठिकाणी लोकांना भेटणार आहोत त्यांच्याबरोबर हितगुज करणार आहोत, त्यांचे प्रश्न समजून घेणार आहोत, आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून संवाद साधणार आहोत. आपला उद्देश साधा आणि सोपा आहे: पुण्यातल्या पुणेकरांनी एकत्र यावे, पुण्याचं बोलावे, आणि पुण्याच्या नेतृत्वासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांना सांगावे की पुण्याचं जर तुम्ही बोलणार असाल तरच आमचं मत तुम्हाला मिळेल. ही यात्रा पुण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून जाणार आहे ती थांबत थांबत जाणार आहे. तुम्हाला जिथे संग्रामला भेटायची इच्छा होईल तिथे तुम्ही नाव नोंदवा आणि संग्राम ला येऊन भेटा.

यात्रेसाठी मी काय-काय आणायचं आहे?

उन्हासाठी टोपी आणि एखादी बाटली पाणी खूप होईल. संग्राम ला भेटण्यासाठी फार चालण्याची पण गरज नाही. ठरलेल्या ठिकाणी व ठरलेल्या वेळी संग्राम येईल आणि तुमच्या बरोबर संवाद साधेल. होय, येताना आपले प्रश्न मात्र घेऊन या. संग्राम बद्दलचे प्रश्न. पुण्याबद्दलचे प्रश्न. बोलायच्या तयारीने या. आणि ऐकायच्या सुद्धा बरं का?

मला यात्रेला येता नाही आलं तर?

तुम्ही संग्रामचे सोशल मीडिया हँडल्स, टेलिग्राम चॅनेल, व्हाट्सअप चॅनेल, आणि वेबसाईटवरून यात्रेत सहभागी होऊ शकता. यात्रेबद्दल सर्व माहिती, फोटो, व्हिडिओ, आणि इतर बातम्या तुम्हाला या माध्यमांतून कळतील.

अजून प्रश्न आहेत? मग हे बघा…